पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद
पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पाथर्डी शिवारामध्ये आज सकाळच्या वेळी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या बिबट्याला पुन्हा वनवासात सोडले जाणार आहे.

आज पहाटेच्या सुमारास शहरातील मौजे पाथर्डी येथील संजय गंगाधर नवले यांच्या मालकीच्या नवले मळा यांचे मालकी गट नंबर 216 मध्ये लावण्यात आलेल्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे . वन्यप्राणी बिबट्या वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरीत्या आहे.

दरम्यान, येथून जवळच असलेल्या पाथर्डीमध्येच शिवपुराण कथा सोहळा सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि त्याच परिसरातबिबट्या जेरबंद झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group