पंचक गावात बिबट्या अडकला पिंजऱ्यात  ; अजून एक बिबट्या असल्याने गावकऱ्यांमध्ये  भीतीचे वातावरण
पंचक गावात बिबट्या अडकला पिंजऱ्यात ; अजून एक बिबट्या असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : मानवी वस्तीत येऊन फेरफटका मारणाऱ्या नर जातीचा बिबट्या पंचक गावाजवळ लावलेल्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. मात्र या ठिकाणी अजून एक बिबट्या असल्याचे वन विभागाने सांगितल्याने शेतकरी व गावकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंचक गावाच्या आसपास अनेकदा बिबट्याने दर्शन दिले. अनेक कुत्रे, पाळीव प्राणी यांच्या शिकार बिबटे करीत असत. माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी वन विभागाशी संपर्क केला असता वन विभागाने जलशुद्धीकरण पंचक येथील झाडाझुडपात दोन दिवसापूर्वी पिंजरा लावला. 

आज सकाळी या पिंजऱ्याच्या दिशेने आवाज येऊ लागल्याने पिंजऱ्यात नर जातीचा सुमारे सहा ते सात वर्षाचा बिबट्या अडकल्याचे समजले. वन अधिकारी अनिल अहिरराव व सहकारी यांनी बिबटयास सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटिका येथे उपचारा करीता घेऊन गेले. 

त्यावर उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.मात्र याच ठिकाणी एक मादी जातीचा बिबट्या असल्याची खात्री असून परिस्थिती पाहून पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी माजी नगरसेवक सुनील बोराडे  व नागरिकांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group