नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आज सकाळी बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली असून, वनविभागाच्य पथकाने बिबट्याचे रेस्क्यु केले आहे.
आज सकाळच्या सुमारास विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्या एका कोपऱ्यात बसला असल्याचे कर्मचाऱ्याला दिसला. त्याने हीबाब वरिष्ठांना कळवली. त्यानुसार वनविभागास पाचारण करण्यात आले. त्यानुसार पथकाने विद्यापीठाच्या रेस्ट हाऊसमध्ये धाव घेतली. तेथे बिबट्याचे रेस्क्यु करण्यात आले.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपाल अनिल अहिरराव, उत्तम पाटील , हनुमंत सावकार, नवनाथ गोरे, दीपक जगताप व इतर कर्मचारी व टीम यांनी हे ऑपरेशन राबविले.