देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
img
दैनिक भ्रमर
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प - नाशिक तालुक्यातील दारणा काठच्या परिसरात असलेल्या भगूर जवळील बार्न्स स्कूल परिसरात सोमवारी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून परिसरात अजूनही बिबटे मुक्त संचार करीत असून पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प परिसरातील लॅम रोड, जमाल सेनेटोरियम, गोडसे मळा, चारणवाडी, सह्यादी नगर, सोनेवाडी परिसरात बिबट्याचे अस्तित्व वेळोवेळी सिद्ध झाले असून धोंडी रोड, चौधरी मळा, बार्न्स स्कूल रोडवर परिसरात दोन बिबटे एकाच वेळी रस्ता ओलांडताना व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत होते तसेच स्थानिक नागरिक व शाळा प्रशासनाने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. 

त्यानुसार वन विभागाने बार्न्स स्कूलच्या परिसरात चार दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला असून माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी सुमित निर्मळ, अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे सोमनाथ निंबेकर, अशोक खानझोडे यांनी बार्न्स स्कूल येथून पिंजऱ्यासह बिबट्या नाशिक येथील TTC म्हसरूळ येथे हलवण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group