भोंदूबाबासाठी बिबट्याची शिकार केल्यानंतर बिबट्याचे अवशेष सापडले घरात
भोंदूबाबासाठी बिबट्याची शिकार केल्यानंतर बिबट्याचे अवशेष सापडले घरात
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी तालुक्यातील बिबट शिकार प्रकरणात आज वन विभागाच्या पथकाकडून पिंपळगाव मोर येथील मोराचा डोंगर येथे शिकार झालेल्या जंगल परिसरात सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत बिबट वन्यप्राण्याच्या इतर अवयवांचा शोध घेण्यात आला.

या शोधमोहीमेत वनविभागाचा खाक्या दाखविल्यानंतर आरोपींच्या घरातून प्राण्याच्या हाडांचे अवशेष मिळाले. अवशेष हे प्रथमदर्शी बिबट वन्यप्राणी याचे असल्याचा अंदाज आहे. पुढील तपासणीसाठी हे अवशेष प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तसेच, मृत बिबटचे चार सुळे व एक नख देखील हस्तगत झाले आहेत.

ही शोधमोहीम पंकज गर्ग, उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक, अनिल पवार, सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव), पश्चिम भाग, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली केतन बिरारीस, वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी (प्रा), इगतपुरी, पेठ व ननाशी वनक्षेत्र स्टाफ यांनी जबाबदारीने पार पाडली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group