सिन्नरला विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेसक्यु तर प्राण्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
सिन्नरला विहिरीत पडलेल्या बिबट्याचे रेसक्यु तर प्राण्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी) :- कडा नसलेल्या विहिरीत पडलेल्या बिबटयाला वन विभागाने सुरक्षित रित्या बाहेर काढले तर एका बिबट्याचे बछड दुसऱ्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले.

 याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी सिन्नर येथील मापरवाडी मधील पांडुरंग बाबुराव पवार यांच्या गट नंबर 50 मधील कडा नसलेल्या विहिरीत एक अडीच ते तीन वर्षाचा बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले.

उपवनसंरक्षक पश्चिम भाग पंकज गर्ग, सहाय्यक उपवनसंरक्षक पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. बोडके, एस. गिते, व्ही. टी. कांगणे, जी. बी. पंढरे, रोहित लोणारी, पंकज कुऱ्हाडे, निखिल वैद्य तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील व गावकरी यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकला त्यात अलगद बिबट्या आला. त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी माळेगाव येथे रवाना केले.

सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथे सकाळी शेरी मळा येथील रमेश शेळके व गोविंद दळवी हे गव्हाच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या गट नंबर 499 मधील शेताच्या बांधावर चार ते पाच महिन्याचा नर जातीचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गाढवे, वनसेवक रामदास हरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.


आई पासून काही अंतरावर बिछडलेल्या बछड्यावर दुसऱ्या वन्य प्रण्याने हल्ला केला, त्यात तो नर जातीचा बछडा ठार झाला. शवविच्छेदन करीता रवाना करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group