सिन्नरच्या माळेगाव midc मध्ये कंपनीत भट्टीचा स्फोट
सिन्नरच्या माळेगाव midc मध्ये कंपनीत भट्टीचा स्फोट
img
दैनिक भ्रमर
नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील माळेगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीमध्ये भट्टीचा स्फोट झाला.

या दुर्घटने मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्रथम दर्शनी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने निमा उद्योजक संघटनेचे उद्योजक देखील या ठिकाणी बचाव करण्यासाठी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर माळेगाव येथील हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीत आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भट्टी फुटून तेथे आग लागली. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिली गेली. स्फोट झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रथमदर्शनी माहिती दिली जात आहे.

पतीच्या मारहाणीत नवविवाहित पत्नीचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील घटना
https://dainikbhramar.com/news/v/1353/newly-wedded-wife-dies-after-being-beaten-by-her-husband-incidents-in-nashik-district

हा स्फोट झाल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोंढे पसरले आहे. पसरलेले हे काळात धुळ्याचे लोंढे बघितल्यानंतर, कंपनी व्यवस्थापन , आजूबाजूचे कामगार नागरिक हे मदतीला धावून आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group