नाशिकच्या हिरावाडी रोडवरील नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात धर्माधिकारी चौकात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी १० ते १५ पाईपांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. मात्र, बाजूलाच असलेली मारुती ईरटीगा वाहन जळून खाक झाले असून आगीची तीव्रता एवढी होती की बाजूला असलेले मनपाच्या गार्डन मधील साहित्य देखील जळून खाक झाले आहे.
याबाबत मिळालेलीअधिक माहिती अशी की, हिरावाडी रोडवर नंदिनी अगरबत्ती पाठीमागे नंदिनी नगर आहे. या नंदिनी नगर मध्ये पंचवटीतील शेती उपयोगी अवजारे व मशिनरीचे दुकान आहे. सदर दुकान मालक हे या नंदिनीनगर मध्ये राहतात. नंदिनी नगरमध्ये मोकळ्या भूखंडावर असलेल्या एका दुकानातील शेती उपयोगी पाईप ठेवलेले होते. आज दुपारी सुमारे साडेचार वाजेच्या सुमारास या पाईपांना अचानक अचानक आग लागली. या आगीत मारुती ईरटीगा वाहन जळून खाक झाले असून बाजूला असलेले गार्डन मधील साहित्य देखील जळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस व अग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही आग इतकी भीषण होती की, मोकळा भूखंड लगत उद्यानात असलेले साहित्य जळून खाक झाले. या आग लागलेल्या पाईपालगत एकूण चार वाहन लावलेली होती. त्यात मारुती ईरटीगा , व तेथील तीन झाडे जळून खाक झाले आहे.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन केंद्राचे केन्द्रप्रमुख एस. जे. कानडे, लीडिंग फायरमन व्ही. आर. गायकवाड, डी. पी. पाटील, फायरमन एम. डी. म्हस्के, व्ही. सी. सरोदे यांनी परिश्रम घेतले.