भीषण ! वर्ध्यात स्टील कंपनीत मोठा स्फोट, 17 कामगार जखमी
भीषण ! वर्ध्यात स्टील कंपनीत मोठा स्फोट, 17 कामगार जखमी
img
दैनिक भ्रमर
 वर्ध्याच्या एवोनिथ स्टील कंपनीत मोठा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भुगाव इथंल्या कंपनीत फर्निशच्या बाजूला हा स्फोट झाला आहे.या स्फोटात 17 कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर जखमी झाले आहे. जखमींची संख्या   वाढण्याची शक्यता आहे. 

कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून या स्फोटात 17 कामगार जखमी असून यातील काही कामगार गंभीर असल्याची माहिती आहे. स्फोटाच्या  घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी व गंभीर जखमींना मीं शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेतील गंभीर जखमींना मीं नागपूरला हलविण्यात येत असल्याची माहिती आहे.

 दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कंपनील काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं पाहायला मिळालं. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group