"या" ठिकाणी भंगार गोदामाला भीषण आग , लाखो रुपयांचं नुकसान ; आगीचे कारण गुलदस्त्यात
img
Dipali Ghadwaje
धुळे : दोंडाईचा शहरातील गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगार व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत. या ठिकाणी अचानक भंगार गोडाऊनला आग लागल्याने लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. 

दोंडाईचा येथील धुळे रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगारच्या गोडाऊनला रात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे, नंदुरबार, शहादा, सिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू असून, अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही.

आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने परिसरातील घरांनाही आगीचा मोठा फटका बसलाय. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अजूनही आग नियंत्रणात नसल्याने जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आग कशामुळे लागली हे कारण अजून गुलदस्त्यात असून, प्रशासनाकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जातोय, तर दुसरीकडे नागरी वसाहतीमध्ये भंगारच्या गोडाऊनला परवानगी कशी दिली गेलीय, याचा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहा ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू असल्याने आग पेठ घेत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलेय. रात्रीपासून लागलेली आग अद्यापदेखील नियंत्रणात आलेली नसून, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

परंतु सदर आग अजून देखील सुरू असल्याने या ठिकाणी धुळे, नंदुरबार, शहादा, दोंडाईचा या ठिकाणाहून अग्निशामक दलाच्या गाड्या आणि अधिकारी मोठ्या प्रमाणावर आग विझवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहायला मिळतंय.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group