सात हजारांची लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकार्‍यासह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
सात हजारांची लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकार्‍यासह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : दहा हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी सात हजार रुपयांची लाच घेताना साक्री येथील सहाय्यक कृषी अधिकार्‍यासह कंत्राटी डेटा ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

साक्रीच्या तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम कोळशीराम चौरे (वय 45) व त्याच कार्यालयातील कंत्राटी डेटा ऑपरेटर रिझवान रफिक शेख (वय 23) यांच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांच्या नावे साक्री तालुक्यातील पन्हाळीपाडा येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर प्रधानमंत्री प्रसाद सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुदान जमा झाले होते. या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात चौरे व शेख यांनी तक्रारदारांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून दहा हजार रुपयांपैकी सात हजार रुपये लाचेची रक्कम शेख यांनी स्वीकारली असता दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
dhule | bribe | ACB | sakri |
इतर बातम्या
Join Whatsapp Group