25 हजारांची लाच घेताना वायरमनला अटक
25 हजारांची लाच घेताना वायरमनला अटक
img
Dipali Ghadwaje

नाशिक (प्रतिनिधी) :- जुने वीज मीटर बदलून नवीन बसविण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना जळगाव येथील आदर्शनगर भागातील वीज मंडळ कार्यालयातील वायरमन संतोष भागवत प्रजापती (वय 32) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत माहिती अशी, की जळगाव येथील 59 वर्षीय तक्रारदाराने आईच्या नावाने असलेले जुने झालेले वीज मीटर नवीन बसविण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार आलेल्या वायरमन संतोष प्रजापती याने या कामासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधताच सापळा रचून 25 हजारांची लाच घेताना वायरमन प्रजापती यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार रवींद्र घुगे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी व प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. याबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group