नाशिक :- 2 हजारांची लाच घेताना सातपूर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक
धनराज सोनु गावित (वय 57) व पोलीस हवालदार कांतीलाल रघुनाथ गायकवाड (वय 41) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे सुमारे 6 वर्षांपूर्वी सातपुर येथील सम्राट बिल्डर यांचेकडे अपना घर स्कीम नं 1 आनंदवल्ली शिवार, नाशिक येथे रुपये 23,50,000 मध्ये 2 BHK फ्लॅट बुक केले होते व त्यासाठी सम्राट बिल्डरच्या डायरेक्टर श्रीमती श्वेता गुप्ता यांचे बॅंक अकाउंटवर 21000 रुपये चेक द्वारे दिले होते. पैसे देऊन 6 वर्षांचा कालावधी झाला तरी सुद्धा यातील तक्रारदार यांना फ्लॅटचे कागदपत्र किंवा ऍडव्हान्स म्हणुन दिलेले 21000 परत न दिल्याने तक्रारदार यांनी सातपुर पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता.
सदर अर्जांची चौकशी asi गावित व पोहेवा. गायकवाड यांच्याकडे देण्यात आली होती. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी पोहेवा गायकवाड व asi गावित यांनी तक्रारदार व सम्राट बिल्डरचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवुन आणुन तक्रारदार यांना सम्राट बिल्डरचे प्रतिनिधी यांनी 21000 हजार रुपयांचा चेक दिला होता .म्हणून यातील आरोपी गायकवाड व गावित यांनी आम्ही तुमचे काम करून दिले त्याबद्दल आम्हाला बक्षीस म्हणून रक्कम द्या, असे सांगितले परंतु यातील तक्रारदार यांची लाच द्यायची इच्छा नसतांना रोख स्वरूपात 2000 दिले होते.
त्यानंतर दिनांक 23/10/2024 रोजी आरोपी गावित यांनी पुन्हा पैशाची मागणी करून व गावित यांची पैसे मांगणी बाबत पडताड़णी करून दिनांक 24/10/2024 रोजी यातील आरोपी गायकवाड याने गावित यांच्या समक्ष संमतीने 2000/- रु ची लाच घेतांना रंगेहात मिळुन आले आहे . दोन्ही आरोपींविरुद्ध सातपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. सुनील पवार, पो.ना. अविनाश पवार, पोहवा दिनेश खैरनार यांनी केली.