नाशिक : स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारत  भाजपमध्ये माजी आमदारासह 'या' बड्या नेत्यांचा प्रवेश
नाशिक : स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारत भाजपमध्ये माजी आमदारासह 'या' बड्या नेत्यांचा प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपने काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का दिला आहे. नाशिक भाजपमध्ये आज अनेक पक्षप्रवेश झाले असून मनसेच्या माजी आमदारानेही भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवत अनुपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे, स्थानिक भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. 

उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ यांचाही भाजपात प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. मात्र, तरीही वाघ यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यासह, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे दिनकर पाटील यांनी सातत्याने भाजपवर सडकून टीका केली होती. आता, त्यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे.  


इतर बातम्या
Join Whatsapp Group