अंघोळीचा साबण ठरला जीवघेणा! २० वर्षीय अथर्व द्विवेदीचा उपचारादरम्यान मृत्यू; इंदिरानगर पोलिसांत नोंद
अंघोळीचा साबण ठरला जीवघेणा! २० वर्षीय अथर्व द्विवेदीचा उपचारादरम्यान मृत्यू; इंदिरानगर पोलिसांत नोंद
img
नितीशा कुलकर्णी





नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अथर्व द्विवेदी असं या घटनेत मृत झालेल्या तरूनाचे नाव आहे. अर्थर्वने अंघोळीचा साबण खाल्याने आपला जीव गमावला. 

प्रकृती अचानक खालावली

अथर्व द्विवेदीच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अर्थवने साबण का खाल्ला? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. साबण खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला त्रास होऊ लागला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी वेळ न घालवता त्याला उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी अर्थर्वला तपासलं तेव्हा त्यांना शॉक बसला. साबण खाल्ल्याने डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले पण त्याचा जीव वाचवता आला नाही.

द्विवेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अथर्व हा 'स्पेशल चाइल्ड' असल्याची माहिती समोर आली आहे. काय खावं आणि काय खाऊ नये, याची समजूनत नसल्याने त्याने साबण खाल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणानंतर मात्र द्विवेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group