राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार माणिकराव कोकाटे यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १९९५ च्या फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात नाशिकच्या सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती . या निर्णयाला कोकाटे यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून, आज त्यावर सुनावणी होत पार पडली .
दरम्यान, कोकाटे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. कोर्टाने कोकाटे यांच्या पक्षावर कडक ताशेरे ओढले असून, आजच निकाल दिला आहे . १ लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटे यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. कोकाटे यांना तूर्तास जेलमध्ये जावे लागणार नाही.
नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्याविरोधात कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती, दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना हाय कोर्टानं माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे . तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांची अटक आता टळली आहे.
नाशिकमधील सदनिका प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं. अटक वॉरंट जारी होताच माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, आता या प्रकरणात त्यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे.