नाशिक : बेथेलनगर गोळीबार प्रकरणी तब्बल १४ जणांच्या टोळीस अटक, पिस्तूल जप्त
नाशिक : बेथेलनगर गोळीबार प्रकरणी तब्बल १४ जणांच्या टोळीस अटक, पिस्तूल जप्त
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शरणपूर रोडवरील बेथेलनगर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तब्बल 14 संशयितांना अटक केली, तसेच दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. दरम्यान, याच टोळीकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेले पिस्तूल व कोयता जप्त करण्यात आला आहे.



याबाबत माहिती अशी, की गेल्या दि. 3 नोव्हेंबर रोजी बेथेलनगर येथे अज्ञात गुंडांनी गोळीबार केला व काही जणांनी कोयत्याने व बिअरच्या बाटलीने परिसरातील वाहनांची मोडतोड करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून, पूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्रित काम करणारे हर्षद पाटणकर व राहुल पवार यांच्यातील आपसातील वादातून ही चकमक उडाली, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून, सरकारवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी अजय मोहन देवरे (वय 21), भारत अंबादास कुर्‍हाडे (वय 19), विकी अनिल गुंजाळ (वय 18), लंबोदर विष्णू फसाळे (वय 18), रोशन अनिल शिंदे (वय 19, रा. गोवर्धन), भूषण ऊर्फ शुभम् देवीदास पवार (वय 27), तुषार विठ्ठल कापसे (वय 21, सर्व रा. गोवर्धन), मानस संतोष जाधव (वय 22), प्रेम सुनील जगताप (वय 19), ओम् ऊर्फ मोहित संतोष जगताप (वय 20),  राहुल मच्छिंद्र पवार (वय 32), राज सुनील पवार (वय 22,) दर्शन अनिल पवार (वय 25, सर्व रा. गंगापूर गाव) व नीलेश नंदू रणमाळे (वय 29, रा. कृष्णनगर, हनुमानवाडी, पंचवटी) या चौदा जणांना अटक केली असून, पुढील तपासात पिस्तूल व कोयते जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group