मेळा बसस्थानकावर बसमध्ये चढताना महिलेची चार तोळ्यांची पोत लंपास
मेळा बसस्थानकावर बसमध्ये चढताना महिलेची चार तोळ्यांची पोत लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - बसमध्ये चढणार्‍या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने चार तोळे वजनाची पोत चोरी करून नेल्याची घटना मेळा बसस्थानकावर घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अरुणा सुभाष देवरे (वय 63, रा. पवननगर, सिडको) या दि. 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानकावर उभ्या होत्या. अमळनेर येथे जाणार्‍या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून 4 तोळे 810 मिलिग्रॅम वजनाची 2 लाख रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. 

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार महाले करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group