नाशिक : गावठी कट्टा, काडतुसे, धारदार कोयता बाळगणारा युवक जेरबंद
नाशिक : गावठी कट्टा, काडतुसे, धारदार कोयता बाळगणारा युवक जेरबंद
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर - नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून अवैधरित्या १ गावठी कट्टा ( पिस्टल ), २ जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला हा संशयित आरोपी अटक करण्याची कामगिरी फत्ते केली. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या गुप्त माहितीनुसार पोलीस अंमलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, योगिता काकड, मयूर कांगणे, नवनाथ शिरोळे, तुपलोंढे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

हे ही वाचा... 
पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

गुप्त बातमीनुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत घोटी ते सिन्नर रस्त्यावरील एसएमबीटी रुग्णालयाजवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक यास शिताफीने पकडण्यात आले. त्याच्याकडून अवैधरित्या कब्जात बाळगलेला १ गावठी कट्टा ( पिस्टल ), २ जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी कोयता मिळून आले. म्हणून वाफिवऱ्हे पोलीस ठाण्यात त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हेगार सराईत असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. या कामगिरीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group