नाशिक : नफा कमावण्याचे आमिष दाखवीत एका इसमाची १६ लाखांची फसवणूक
नाशिक : नफा कमावण्याचे आमिष दाखवीत एका इसमाची १६ लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : यूएसडीटी विक्रीतून नफा कमावण्याचे आमिष दाखवीत दोघांनी संगनमताने एका इसमाची 16 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी यांना ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत योगेश व सागर नावाच्या इसमांनी फोन करून यूएसडीटी विक्रीतून चांगला नफा मिळवून देऊ, असे आमिष दाखविले. फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एक क्यूआर कोड स्कॅन केला. आरोपींनी या क्यूआर कोडच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या ट्रस्ट वॉलेटचा अ‍ॅक्सेस मिळवून वॉलेटमधील 16 हजार 604 यूएसडीटी अन्य वॉलेटवर ट्रान्स्फर करून फिर्यादी यांची 15 लाख 69 हजार 78 रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात योगेश आणि सागरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group