नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणीवर रूम मध्ये डांबून ठेवत लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणी ही नाशिक येथे आल्यानंतर २३ वर्षीय आरोपी समीर इम्तियाज काझी रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर, सिडको) याने पीडितेला सिंहस्थनगर येथे एक रूम करून दिली. त्या रूममधून पीडितेला त्याने बाहेर पडू दिले नये धक्कादायक म्हणजे त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो रूमवर यायचा आणि तरुणीवर अत्याचार करायचा. एक दिवस तरुण बाहेर जाताच पीडितेने संधी शोधून तेथून पळ काढला.
हे ही वाचा
यानंतर पीडितेने अंबड पोलीस ठाणे येथे या घटनेची तक्रार दिली. या प्रकरणी समीर काझी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.