देवळा ; खर्डे ता देवळा येथे सोमवारी दि १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या काळपावर हल्ला चढवत चार मेंढ्या फस्त केल्या तर पाच मेंढ्या गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे .बिबट्याने अगदी गावाच्या हकेच्या अंतरावर असलेल्या सेत शिवारात दहशत निर्माण केल्याने पशु पालकांसह गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .वनविभागाने या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी येथील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे ) विभाग प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा खर्डे गावालगत तसेच इंदिरा गांधी विद्यालय समोर असलेल्या कांद्याची काढणी झालेल्या शेतात येथील मेंढपाळ रवींद्र वासुदेव यांनी वाडा टाकला असून,सोमवारी दि १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बिबट्या ने या वाड्यातील मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवला यात बिबट्या ने चार मेंढ्या फस्त केल्या तर चार ते पाच मेंढ्या गंभीर जखमी केल्या आहेत . या घटनेमुळे मेंढपाळ वासुदेव यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे .
बिबट्या ने मेंढ्यांवर हल्ला चढवला त्या वेळी मेंढपाळ वाड्यालगत झोपले होते . काही क्षणार्धात बिबट्या ने घटनास्थळावरून धूम ठोकली . याठिकाणी दोन ते तीन बिबटे असल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी यावेळी सांगितले . या घटनेमुळे गावात राहणाऱ्या व आजूबाजूला सेत शिवारात राहणाऱ्या पशु पालक तसेच शेतकऱ्यांचमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मृत व जखमी मेंढ्यांच्या पंचनामा केला असून, मेंढपाळ वासुदेव यांना ततात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे . आज मंगळवारी दि २० रोजी सकाळी नागरिकांनी पाहणी करून हळहळ व्यक्त केली .
तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी याठिकाणी पिंजरा बसविण्याची मागणी केली . खर्डे सह पंचक्रोशीतील कणकापूर, कांचने ,शेरी ,वार्शी, हनुमंत पाडा ,मुलुख वाडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे . जनावरांवर वारंवार हल्ले होत असल्याचे बोलले जात असून,वनविभागाने याची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा . अशी मागणी शेवटी विजय जगताप यांनी केली आहे .