चांदवड येथील मुंबई आग्रा हायवे वरील भरवीर शिवारात सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत तो जखमी झाला होता. याबाबतची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला व चांदवड टोल नाका पेट्रोलिंग टीमला दिली.
पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले. बिबट्या रस्त्यावर जखमी असल्यामुळे सोमाटोल नाक्या तर्फे येणारी वाहतूक एक साईडने वनवे करत थांबविण्यात आली होती. परिसरातील नागरिक व रस्त्यावरील वाहनांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
वन विभागाचे अक्षय म्हेत्रे, संजय वाघमारे, अजय शिंदे, भगवान जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी एम एम विसपुते, अलकेश चौधरी, नाशिक येथील इको संस्थेचे अभिजीत महाले व त्यांची टीम व वन विभाग चांदवड, निफाड, येवला व नांदगाव या टीम, वन क्षेत्राची सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याला रेस्क्यू करत औषध उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांच्याकडे रवाना करून दिले.