Video : वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ काठी वापरत बिबट्याला केले जेरबंद
Video : वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ काठी वापरत बिबट्याला केले जेरबंद
img
Dipali Ghadwaje
बिबट्यासारखे प्राणी अनेकवेळा गावात घुसल्याची उदाहरणे आहेत. यामुळे गावातील पाळीव प्राणी किंवा मानवावर बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. सोशल मीडियावर सध्या वनविभागाचे कर्मचारी आणि बिबट्याच्या लढतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गावात घुसलेला बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहेत. केवळ एका काठीच्या मदतीने दोन कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला पकडले. पण काही सेंकदाचा हा थरार अंगावर शहारे आणणार आहे. हा व्हिडिओ काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये
केवळ ५१ सेंकदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये बिबट्या आणि वन विभागातील कर्मचारी यांच्यात काही पावलाचे अंतर दिसत आहेत. अचानक बिबट्या त्या कर्मचाऱ्यावर हल्ला करतो. मग तो कर्मचारी त्याचे पुढचे दोन पाय पकडून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी दुसरा कर्मचारी त्याच्या मदतीसाठी धावत येतो. तो काठीने त्या बिबट्यावर हल्ला करतो. मग इतर गावकरी काठ्या घेऊन त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी येतात. शेवटी त्या बिबट्याच्या मुसक्या आवळल्या जातात. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहास या व्हिडिओमधून दिसून येत आहे.

दरम्यान पकडलेल्या बिबट्याने तीन वनकर्मचाऱ्यांसह दोन महिलांवर हल्ले केले होते. त्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचा प्रयत्न सुरु होता. 

अखेर दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या साहसामुळे त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यात आले. त्याची तपासणी करुन त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group