इलॉन मस्कचा मोठा धक्का! एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी आता मोजावे लागणार पैसे
इलॉन मस्कचा मोठा धक्का! एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी आता मोजावे लागणार पैसे
img
DB
इलॉन मस्कने एक्स पुर्वीचे ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जेव्हापासून इलॉन मस्क X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक बनले, तेव्हापासून त्याचे संपूर्ण लक्ष X मधून पैसे कमविण्यावर केंद्रित आहे.  इलॉन मस्कने एक्सच्या नवीन वापरकर्त्यांसाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. इलॉन मस्क यानी म्हटले आहे की, X वर येणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि ती रक्कम नाममात्र असेल, त्यांनी किती पैसे द्यावे लागणार हे अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही.


इलॉन मस्कचा विश्वास आहे की, पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, कारण सध्या कोणीही नवीन खाते तयार करत आहे आणि कोणाच्याही बाजूने पोस्ट करत आहे. इलॉन मस्क यानी सांगितले आहे की बॉट्स थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

X च्या नवीन धोरणानुसार X वर पोस्ट करणे, एखाद्याच्या पोस्ट लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्ही फक्त एक खाते मोफत फॉलो करू शकाल. एक्सवरील स्पॅम अकाऊंट आणि इतर गोष्टींना रोखण्यासाठी याबाबत दीर्घकाळापासून चाचपणी सुरू आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group