खुशखबर! नवीन 'डिलीशन' फीचरमुळे आता थ्रेड्स युजर्सची 'ही' चिंता मिटणार
खुशखबर! नवीन 'डिलीशन' फीचरमुळे आता थ्रेड्स युजर्सची 'ही' चिंता मिटणार
img
Dipali Ghadwaje
मुंबई : थ्रेड्सची मालकी कंपनी मेटा सध्या नवीन फिचर वर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही इंस्टाग्राम डिलीट न करताही थ्रेड्स अकाऊंट  सहजपणे डिलीट करता येणार आहे. त्यामुळे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म थ्रेड्स वापरणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे.  

दरम्यान थ्रेड्स ॲप लाँच झाल्यापासून यूजर्स थ्रेड्समध्ये या फीचरची मागणी करत आहेत. सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स विकसित केलं आहे. याची मालकी मेटा कंपनीकडे आहे.   

थ्रेड्स अकाऊंट डिलीट करण्याबाबत काही मर्यादा आहेत. एकदा तुम्ही थ्रेड्सवर अकाऊंट सुरु केल्यावर तुम्हांला ते हटवता म्हणजे डिलीट करण्याचा पर्याय नाही. कारण, थ्रेड्स प्रोफाइल तयार केल्यावर त्यासोबत तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट लिंक होतं. त्यामुळे तुम्ही थ्रेड प्रोफाइल निष्क्रिय करता येऊ शकता. पण, तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यानंतर तुमचे थ्रेड प्रोफाइल डिलीट होतं. यामुळे युजर्सकडून अकाऊंट डिलीट करण्यासाठी वेगळ्या फिचरची मागणी करण्यात येत होती. मात्र, आता थ्रेड्सने यावर उपाय शोधला आहे. यामुळे आता थ्रेड्स युजर्सची मोठी समस्या दूर होणार आहे. 

 थ्रेड्स लाँच झाल्यापासून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स जोडले आहेत. थ्रेड अकाऊंट हटवण्यात सर्वात मोठी समस्या येत होती. आता मेटा लवकरच ही समस्या सोडवणार आहे. खातं हटविण्यासाठी नवीन फिचर आणणार असून तुम्ही थ्रेड्स अकाऊंट सहजपणे हटवू शकाल. थ्रेड्स ॲप इंस्टाग्रामशी जोडलेलं असल्यामुळे दोघांची सेटिंग्ज सारखीच आहेत, ही ॲपच्या बाबतीत यूजर्ससाठी एक मोठी चिंतेची आहे. याचं निरसन करणार आहे.

'डिलीशन' फीचरवर काम 
मिळालेल्या महितिनुसार कंपनी थ्रेड्समधील अकाउंट 'डिलीशन' या फीचरवर काम करत आहे. डिसेंबरमध्ये हे फीचर यूजर्ससाठी आणले जाऊ शकते. इंस्टाग्राम आणि थ्रेड्स अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असल्याने थ्रेड्स अकाऊंट हटवल्यास इंस्टाग्राम अकाऊंट आपोआप हटवलं जातं. यामुळे कंपनीवर जोरदार टीका झाली, त्यामुळे आता कंपनी यामध्ये सुधारणा करत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group