आजकाल सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर आपण सर्वकाही चुटकीसरशी शोधू शकतो. परंतु सोशल मीडियावर अनेक लोक एकपेक्षा जास्त अकाउंट बनवतात. त्यामुळे डेटा गोळा करताना खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळेच सोशल मीडिया युजर्ससाठी सरकारने एक नवीन नियम तयार केला आहे.
ज्यामध्ये तुमचे सोशल मीडिया अकाउंट कायमचे डिलीट होऊ शकते. तुमच्या एका चुकीमुळे तुमचे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते. सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शनच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेतला आहे. यात सोशल मीडिया युजरला माहिती न देता त्याचे अकाउंट डिलीट केले जाईल.
काय आहे सरकारचा नवीन नियम?
सरकारच्या नवीन नियमानुसार, ज्या युजर्सनी गेल्या तीन वर्षात सोशल मीडिया अकाउंट वापरले नाही, त्या अकाउंटद्वारे कोणतीही पोस्ट केली नाही. सरकार त्यांचे अकाउंट बद करु शकते. सोशल मीडियाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा नियम सर्व ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या तसेच सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू केला जाणार आहे. या नवीन नियमानुसार युजर्सचा डेटादेखील मिळेल.
कोणत्या युजर्संचे होणार नुकसान?
सरकारच्या या नियमानुसार, ज्या युजर्संनी खूप दिवस आपले सोशल मीडिया अकाउंट उघडले नाही त्यांचे नुकसान होणार आहे. कारण, सरकार कोणत्याही क्षणी सोशल मीडिया अकाउंट डिलीट करु शकते. अनेकजण पासवर्ड विसरले की नवीन अकाउंट उघडतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. खूप दिवस सोशल मीडिया अकाउंट न वापरल्यास तुमचे अकाउंट डिलीट केले जाईल.