ग्राहकांना मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रिचार्ज महागणार
ग्राहकांना मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रिचार्ज महागणार
img
Dipali Ghadwaje
सध्या देशात लोकसभा निवडणूक होत आहे. 4 जून 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर करोडो मोबाईल वापरकर्त्यांना मोठा धक्का बसू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईलचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. ही वाढ 25 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यानंतर ARPU वर वापरकर्त्यांची संख्या वाढेल म्हणजेच कंपन्यांच्या सरासरी महसूलात वाढ  होणार आहे.

दरम्यान ब्रोकरेज फर्म ॲक्सिस कॅपिटलच्या अहवालात असे म्हटले आहे की कंपन्यांनी 5G मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत कंपन्या नफ्याकडे लक्ष देत आहेत. अशा परिस्थितीत मोबाइल ऑपरेटर सुमारे 25 टक्क्यांनी दर वाढवू शकतात. माहितीनुसार, शहरी आणि ग्रामीण भागात ही वाढ दिसून येते. अहवालानुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही योजना पूर्वीपेक्षा महाग होऊ शकतात. दुसरीकडे, इंटरनेट योजना देखील महाग होऊ शकतात.

तर दुसऱ्या बाजूला इंटनेट प्लॅनच्या किंमतीही वाढू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाइल रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्यामागील कारण प्रति युजरच्या मागे महसूलात वाढ करण्याचे आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रति युजर महसूल फार कमी आहे. याचा अर्थ असा होतो की, मोबाइल कंपन्या प्रत्येक युजरसाठी पैसे खर्च करत असतली तरीही समाधानकारक कमाई होत नाहीये. याच कारणास्तव टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

किती रुपयांनी महागणार रिचार्ज प्लॅन?

रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्यास सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचा रिचार्ज करत असल्यास त्यात 50 रुपयांची अधिक वाढ होईल. याचा अर्थ असा होतो की, 200 रुपयांच्या रिचार्जसाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय 1 हजार रुपयांच्या रिचार्जमध्ये 250 रुपयांपर्यंत वाढ होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यास टेलिकॉम कंपन्यांच्या मूळ रिचार्जच्या किंमती वाढल्या जाणार आहेत. एअरटेल कंपनीच्या मूळ किंमतीत 29 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जिओमध्ये 26 रुपयांची वाढ होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी वर्ष 2019 आणि 2023 दरम्यान रिचार्ज प्लॅमध्ये तिप्पट वाढ केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group