निवडणूक संपली आता रेपो रेटचं काय होणार? RBIच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
निवडणूक संपली आता रेपो रेटचं काय होणार? RBIच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
img
Dipali Ghadwaje
मुंबई : लोकसभा निवडणूक संपलेली आहे. आता लवकरच देशातील अनेक धोरणांत बदल होतील. भारतीय रिझर्व्ह बँकदेखील 7 जून रोजी असाच एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे . 7 जून रोजी आरबीआयकडून रेपो रेट ठरवले जाणार आहेत. या रेपोरेटनुसार तुमच्या गृह तसेच इतर कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार की नाही? हे स्पष्ट होईल. 

पाच जूनपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक चालू आहे. ही तीन दिवसीय बैठक 7 जून रोजी संपत आहेत. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेटबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

सध्या रेपो रेट 6.50 टक्के आहे. गेल्या सलग सात वेळा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उद्या आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करणार की त्यात कपात केली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group