कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण कर्जाचा हप्ता आता कमी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉइंट्सने कपात झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मलहोत्रा यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. पतधोरण बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आपोआप कर्जाचा हप्ता कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक तीन दिवसांपासून सुरु होती. आज या बैठकीचा शेवटचा दिवस होता. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेट आता ५.२५ टक्क्यांवर आला आहे. याआधी रेपो रेट ५.५० टक्के होता.
रेपो रेट म्हणजे नक्की आहे तरी काय ?
रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेद्वारे ठरवला जातो. हा रेपो रेट सर्व बँकांना लागू होतो. यावर आधारित बँका आपल्या कर्जावरील व्याजदर ठरवतात. जर रेपो रेट घसरला तर व्याज कमी होणार आणि रेपो रेट वाढला तर व्याजदेखील वाढणार.
वर्षभरात १२५ बेसिस पॉइंट्सची कपात
रिझर्व्ह बँकेने वर्षभरात रेपो रेटमध्ये १२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात १०० बेसिस पॉइंट्सने कपात झाली होती. त्यानंतर आता दोनवेळा रेपो रेट स्थिर होता. आता पुन्हा यामध्ये कपात केली आहे. रेपो रेटमुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहे.