मोठी बातमी : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, कर्जदारांची प्रतीक्षा पुन्हा वाढली , रेपो दर नवव्यांदा जैसे थे
मोठी बातमी : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, कर्जदारांची प्रतीक्षा पुन्हा वाढली , रेपो दर नवव्यांदा जैसे थे
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळी देखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल. गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. 

शक्तिकांत दास यांनी रेपो रेटविषयक सविस्तर माहिती दिली आहे. चलनविषक धोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल करू नये असे सुचवल्याची माहिती दास यांनी दिली. दास यांनी रेपो रेटविषयी घोषणा करताना जागतिक संकटांवरही भाष्य केलं. आरबीआयने SDF 6.25%, MSF 6.75% तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. 
 
सलग आठव्यांदा रेपो रेट जैसे थे

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची प्रती दोन महिन्यांनी आयोजित केली जाणारी चलनविषक धोरण ठरवणारी तिसरी बैठक पार पडली. 6 ते 8  ऑगस्ट या कालावधीत ही बैठक झाली. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखील एकूण सहा सदस्य असलेल्या बैठकीत रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

तुमच्या कर्जाच्या हप्त्यात काय बदल? 

रेपो रेटमध्ये बदल झाल्यास तुमच्या घर, वाहन तसेच अन्य कर्जाच्या हप्त्यांत बदल होतो. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाही.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group