RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडले आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ५.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे., ज्यामुळे गुंतवणूकदारांना अवघ्या ७० मिनिटांत सुमारे २.१३ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
आरबीआयने ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाईचा अंदाज ३.१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, जो यापूर्वी ३.७ टक्के होता. म्हणजेच, महागाईत काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोर महागाई ४ टक्क्यांच्या आसपास स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढीचा दर अंदाज ६.५ टक्के कायम ठेवला आहे.
आरबीआयच्या घोषणेनंतर बाजारात सर्वत्र कमजोरी दिसून आली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले. रिअल्टी आणि ऑटो क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. रिअल्टीमधील प्रेस्टिज २.५ टक्क्यांनी घसरला, तर फीनिक्स, डीएलएफ, लोढा यांसारख्या शेअर्समध्येही घट झाली.
सर्वाधिक घसरलेले शेअर्स - एटरनल, इन्फोसिस, विप्रो, डॉ. रेड्डी आणि सिप्ला.
सर्वाधिक वाढलेले शेअर्स - कोटक बँक आणि कोल इंडिया, ट्रेंट, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्