पेटीएम फास्टॅग होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी
पेटीएम फास्टॅग होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी
img
Dipali Ghadwaje
पेटीएम संदर्भातील एक महत्वाची बातमी आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता पेटीएम पेमेंट्स बँकेतून कोणतेही व्यव्हार करता येणार नाही. २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेची सर्व खाते बंद केली जाणार आहेत. जर तुमचे फास्टॅग पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडले असेल तर लवकर ते दुसऱ्या अकाउंटवर पोर्ट करुन घ्या.  

पेटीएम पेमेंट्स बँकेतून आता तुम्हाला फास्टॅग सेवा सुरु ठेवता येणार नाहीये. तुम्ही बँकेतील फास्टॅगचे खाते बंद करु शकता किंवा पोर्ट करु शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

फास्टॅगचे तुमचे अकाउंट तुम्हाला स्विच करता येणार आहे. बँक नियामकाने दिलेल्या आदेशानुसार २९ फेब्रुवारीआधी ठेवी किंवा टॉप अप ग्राहकांची खाती, वॉलेट, फास्टॅग सेवा थांबवावी लागणार आहे.

पेटीएम फास्टॅग कसे निष्क्रिय करावे

  • फास्टॅग पेटीएम पोर्टलवर लॉग इन करा. यात तुमचा यूजर आयडी, वॉलेट आयडी आणि पासवर्ड टाकावा.
  • यानंतर फास्टॅग नंबर, मोबाईल नंबर आणि पडताळणीसाठी आवश्यक असलेली माहिती भरावी. त्यानंतर हेल्प आणि सपोर्टवर क्लिक करा.
  • यानंतर Need Help With Non-Order Related Queries वर क्लिक करा.
  • यानंतर फास्टॅग प्रोफाइल अपडेट करण्याचा पर्याय निवडा. तेथे फास्टॅग बंद करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.

पेटीएमवरुन फास्टॅग पोर्ट कसे करायचे?
  • पेटीएमवरुन फास्टॅग पोर्ट किंवा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही ज्या बँकेत फास्टॅग ट्रान्सफर करणार आहात त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा.
  • त्यानंतर त्यांनी तुम्हाला फास्टॅग स्विच करायचे असल्याचे सांगा. आवश्यक माहिती भरा. त्यानंतर बँक तुमचे फास्टॅग अकाउंट पोर्ट करेल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group