भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रविवार, 31 मार्च रोजी बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने X वर ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील. चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकने देशातील सर्व बँकांना ३१ मार्च २०२४ रोजी सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्यावसायिक बँकांसाठी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
तसेच आयकर विभागानेही आपल्या सर्व कार्यालयांसाठी नोटीस जारी केली आहे. वित्त वर्ष २०२४ चे सर्व येणे व देणे व्यवहार पूर्ण करण्यास सुविधा व्हावी, यासाठी रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सरकारने पावत्या आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्च २०२४ रोजी व्यवहारांसाठी बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
1. सलग तीन दिवस बँका राहाणार बंद
२५ मार्चला होळीनिमित्त सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. या आठवड्यात शनिवारी २३ मार्चला चौथा शनिवार, २४ मार्चला रविवार आणि २५ मार्चला धुलिवंदन आल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.
2. कोणत्या बँका सुरु राहातील?
३१ मार्च रोजी देशभरातील बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब यांचा समावेश आहे. आणि सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, सिटी युनियन बँक, डीसीबी बँक लिमिटेड, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक, साउथ इंडियन बँक, येस बँक, धनलक्ष्मी बँक, बंधन बँक, सीएसबी बँक, तामिळनाड मर्कंटाइल बँक आणि डीबीएस बँक सारख्या बँका सुरु ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
3. आयकर विभागाचे कार्यालयही राहातील सुरु
बँकांशिवाय आयकर विभागाचे कार्यालही ३१ मार्चला सुरु राहाणार आहे. आयकर विभागाने पुढील आठवड्यात गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द केली आहे. २९, ३० आणि ३१ मार्चला आयटी विभागाचे काम सुरु राहाणार आहे.