दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त शाळा आणि बँका बंद असतात. प्रत्येक दिवस वेगळ्या विधीसाठी समर्पित असतो. तर बँकांना सुट्ट्या किती दिवस असतील ते पाहा. 18 ते 23 ऑक्टोबरदरम्यान कुठे आणि किती दिवस बँका असतील बंद, जाणून घ्या.उद्यापासून 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत दिपावली पर्व आहे. 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. या दरम्यान देशातील विविध शहरातील बँकांना सुट्टी असेल.

> 19 ऑक्टोबर : रविवारची सुट्टीनिमित्ताने बँका बंद.
> 20 ऑक्टोबर: यादिवशी आसाम, अरुणाचलप्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये सुट्टी बँका बंद.
> 21 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजननिमित्ताने महाराष्ट्रातील बँका बंद.
> 22 ऑक्टोबर : बलिप्रतिपदानिमित्ताने महाराष्ट्रातील बँका बंद.
> 23 ऑक्टोबर: भाऊबीजनिमित्ताने गुजरात, उत्तरप्रदेशमध्ये बँका बंद.
> 25 ऑक्टोबर: चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
> 26 ऑक्टोबर: रविवारी बँका बंद राहतील.
> 27 ऑक्टोबर: छठपूजानिमित्ताने कोलकाता, पटना आणि रांचीमध्ये बँका बंद.
> 28 ऑक्टोबर: छठपूजानिमित्ताने पटना आणि रांचीमध्ये बँका बंद.
> 31 ऑक्टोबर: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त गुजरातमध्ये बँका बंद.
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल. त्यामुळे व्यवहारासंबंधीचे कोणतेही काम अडणार नाही.
मात्र बँकिंगसंबंधीची काही कामे मात्र या काळात होण्यास विलंब होईल. RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश असतो. अर्थात सर्वच राज्यात एकाच दिवशी सुट्टी नसेल. काही राज्यात एकाच दिवशी बँका बंद असतील. तरीही कामांचा खोळंबा टाळण्यासाठी सुट्यांच्या यादीवर एक नजर टाका.