दि बिझनेस बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव नगरकर तर उपाध्यक्ष पदी राजश्री कपोते यांची निवड
दि बिझनेस बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव नगरकर तर उपाध्यक्ष पदी राजश्री कपोते यांची निवड
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी) :  नाशिक जिल्यातील प्रमुख अर्थ वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि बिझनेस बँकेच्या अध्यक्षपदी जेष्ठ संचालक वसंतराव नगरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजश्री कपोते तर जनसंपर्क संचालक म्हणून श्रीनिवास लोया यांची निवड करण्यात आली.

बिझनेस बँकेची स्थापना 1997साली झाली. तेव्हा पासून संस्थापक संचालक म्हणून वसंतराव नगरकर बँकेत कार्यरत आहे. या पूर्वी सहा वेळा आणि आज सातव्या वेळी ते बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. उपाध्यक्ष, जनसंपर्क संचालक म्हणून त्यांनी अनेकदा काम केले. मधल्या काळात सहकार क्षेत्र अडचणीत आल्यामुळे नगरकर सोबत सर्व जेष्ठ संचालक यांनी खंबीरपणे उभे राहत बँक टिकावंण्याचे महत्वाचे काम केले.

त्यामुळे आज बँक नाशिक शहरातील अनेक बँकेपेक्ष जोरदार गगनभरारी घेत आहे.सहकार क्षेत्रा बरोबर नाशिकरोड शहरात सांस्कृतिक चळवळ उभी राहावी या साठी नगरकर यांनी ऋतुरंग ची स्थापना आपल्या सहकऱ्या सोबत केली.

आज सकाळी बँकेच्या सभागृहात सहाय्यक निबंधक राजू इप्पर यांच्या अध्यक्षते खाली विशेष बैठक घेण्यात आली. त्यात अध्यक्ष पदा साठी वसंतराव नगरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक इप्पर यांनी वसंतराव नगरकर यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

पाध्यक्ष पदी राजश्री कपोते तर जनसंपर्क पदी जेष्ठ संचालक श्रीनिवास लोया यांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व जनसंपर्क संचालक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ संचालक विजय संकलेचा, डॉ पूनमचंद ठोळे, विजय चोरडिया, बसंत गुरुनानी, मोहन लाहोटी, पुरुषोत्तम फुलसुंदर , सुरेश टर्ले,नेमीचंद कोचर, सचिन घोडके, गोरखनाथ बलकवडे, डॉ उमेश नगरकर, अशा जाजू, गोपीलाल ठक्कर, दयानंद सदाफुले, मुख्य कार्यकरी अधिकारी अशोक भाबड आदी सह बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group