शेतकऱ्यांकडे CBIL मागितल्यास FIR दाखल करू; फडणवीसांचा बँकांना इशारा
शेतकऱ्यांकडे CBIL मागितल्यास FIR दाखल करू; फडणवीसांचा बँकांना इशारा
img
Jayshri Rajesh
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका अशी ताकीद दिली. राज्यस्तरीय बँकर्स समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते.रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडे सीबिल मागितले तर एफआयआर दाखल करणारच असा इशारा देताना तसं झाल्यास आमच्याकडे येऊ नका.  गेल्यावेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे. गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी आपणच उभे राहिले पाहिजे असेही  देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास होऊ नये

कोणत्याही बँकांना शेतकऱ्याला कर्ज नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. सीबीलचे कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नये असेही ते म्हणाले. तसे जर झाले तर FIR दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असेही ते म्हणाले.

 शेतकऱ्यांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याबाबातचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

 नॅनो खतांचा वापर वाढवावा 

डीपीए खतांचा वापर कमी झाला पाहिजे आणि नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. तसेच रासायनिक खतांचे लिकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.  

शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा 

 खरीपाच्या पेरणीत शेतकऱ्यांना  बी बियाणे खते यांचा अपेक्षीत प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. ज्या ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, त्या ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आलाय. तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस नाही, त्या ठिकाणचे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागा माहिती नुसार, येत्या 30 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group