शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR,  'हा' गंभीर आरोप
शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, 'हा' गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण दोघेही सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बॉलिवूडच्या दोन्ही दिग्गज स्टार्स विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांवरही अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

हे ही वाचा 
लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, वंचित बहुजन आघाडीचा नेता ताब्यात

नेमकं प्रकरण काय ?
भरतपूरचे रहिवासी कीर्ती सिंह यांनी 2022 मध्ये तब्बल 23 लाख रुपयांना हुंडई अल्काझार SUV खरेदी केली होती. मात्र काही महिन्यांतच गाडीमध्ये तांत्रिक समस्या दिसू लागल्या. या समस्यांबाबत त्यांनी कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या पण त्यावर कंपनीने काहीही तोडगा काढला नाही. यामुळे त्रस्त होऊन कीर्ती सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर भरतपूरच्या मथुरा गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल झाली.

हे ही वाचा 
हृदयद्रावक ! काळरात्र ठरली, इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

या प्रकरणात हुंडई मोटर इंडियाचे शीर्ष अधिकारी मॅनेजिंग डायरेक्टर एन्सो किम, सीओओ तरुण गर्ग, मालवा ऑटो सेल्स प्रा. लि.चे एमडी नितीन शर्मा, संचालक प्रियंका शर्मा यांच्या नावांसह शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना देखील आरोपी करण्यात आलं आहे. शाहरुख आणि दीपिका हे हुंडई ऑटोमोबाईलचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. तक्रारदार यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, हुंडईच्या प्रचार मोहिमेतून या दोन्ही कलाकारांनी ग्राहकांना गाडीवर विश्वास ठेवायला प्रवृत्त केलं. पण उत्पादन दोष लपवून खोटं चित्र रंगवलं गेलं. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group