अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान जमिनीशी संबंधित वादात सापडली आहे. अलिबागच्या जमीन खरेदीप्रकरणी शाहरुखच्या लेकीवर मोठा आरोप करण्यात येत आहे.
सुहाना खानने 2023 मध्ये अलिबागच्या थळ गावात 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जमीन खरेदी केली होती. यासाठी तिने स्टॅम्प ड्युटीदेखील भरली होती. प्रत्यक्षात ही जमीन सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती आणि सुहानाने ती परवानगीशिवाय खरेदी केली होती. इतकंच नाही तर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सुहानाला चक्क शेतकरी म्हणून दाखवण्यात आलं आहे. ही जमीन देजा वू प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत आहे.
ही कंपनी सुहानाची आई गौरी खानच्या कुटुंबाची आहे. जमीन घेताना कोट्यवधींचा व्यवहार झाला. परंतु महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेल्या जमिनीचा करार सुहानाने केल्याचा आरोप आता होत आहे.