बॉलीवूडचा किंग खान रुग्णालयात दाखल;
बॉलीवूडचा किंग खान रुग्णालयात दाखल; "हे" आहे कारण
img
दैनिक भ्रमर
अहमदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशांचा पुढे गेला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामना काल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.

हा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान अहमदाबादच्या स्टेडियमवर आला होता. या सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली होती. प्राथमिक उपचारांनंतरही त्याला बरं वाटलं नाही. त्यामुळे त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला उष्माघाताचा त्रास झाला.

सनरायझर्स हैदराबादवर मात करत केकेआर यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. सामना जिंकल्यावर संघ आणि केकेआरच्या चाहत्यांसह शाहरुखनेही विजयी जल्लोष केला.
दरम्यान शाहरुखची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं असून तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहे. डिहायड्रेशनमुळे त्याची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group