मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
img
Dipali Ghadwaje
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गणपती सोहळा ताऱ्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला. बाप्पाच्या दर्शनासाठी शाहरुख एकनाथ शिंदेंच्या घरी गेला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बॉलिवूडच्या बादशाहाचं जोरदार स्वागत केलं.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही गेल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाप्पाची मूर्ती भेट म्हणून दिली.  'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आलेल्या अमीषा पटेलनेही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.  'अनुपमा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या रुपाली गांगुलीने देखील बाप्पाचं दर्शन घेतलं. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरही एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती.

तसेच अभिनेत्री पूजा हेगडेने बाप्पाचं दर्शन घेत आरती देखील केली.  बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मुख्यमंत्री एकथाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला बहीण अर्पितासह गेला होता.  'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मानेही मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.  मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी शाहरुख-सलमान एकत्र गेले होते.

या सर्व कलाकारांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसंच, एकत्र जेवणाचा आस्वाद देखील घेतला
इतर बातम्या
Join Whatsapp Group