हरियाणवी आणि बॉलिवूड सिंगर राहुल फाजिलपुरिया यांच्यावर १४ जुलै २०२५ रोजी हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील दक्षिण परिघीय रस्त्यावर (SPR) गोळीबार झाला होता. गुरूग्राममधील एसपीआररोडवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात राहुल थोडक्यात बचावले. या घटनेचा पोलीस तपास करत होते. आता याच प्रकरणात हरियाणातील गुरुग्राम जिल्हा पोलिसांनी ५ शार्प शूटर्सचा एन्काऊंटर केला आहे.
हे ही वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सिंगर राहुल फाजिलपुरियाच्या हत्येचा कट रचणाऱ्या हल्लेखोरांना गुरुग्राम STF ने पकडले आहे. STF आणि क्राइम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत गुरुग्रामच्या वजीरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर ५ शार्प शूटर्सना अटक करण्यात आली आहे. ४ गुन्हेगारांच्या पायात गोळ्या लागल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका शूटरला पाठलाग करून पकडून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.