'वाल्मिकच्या एन्काऊंटरची मला सुपारी आलेली',
'वाल्मिकच्या एन्काऊंटरची मला सुपारी आलेली', "या" पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ
img
Dipali Ghadwaje
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये अटकेत असलेला प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसंदर्भात एक धक्कादायक खुलासा एका माजी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी आली होती, असं या निलंबित अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यात अनेक एन्काऊंटर बोगस होते असंही म्हटलं आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,   वाल्मिकच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा दावा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव रणजीत कासले असं आहे. कासले हे पोलीस उपनिरीक्षक असून सध्या निलंबित आहेत. परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून कार्यरत राहिलेल्या वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी मला देण्यात आली होती, असं कासलेने म्हटलं आहे.

कासलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक दावा केला आहे. तसेच इतक्यावर न थांबता कासलेने, "राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते", असा दावाही कासलेने केला आहे. 
 
हा अधिकारी निलंबित का?

आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवत कासलेंना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच कासले यांनी यापू्र्वीही अनेकदा असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याचं दिसून आल्याने त्यांच्यावर आधीही पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात आलेली. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबद्दल कासलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हिडिओ प्रसारित केल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
 

 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group