पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत वाल्मिक कराडशी संबंधित व्यक्तींनी ऑफीस स्पेसेस विकत घेण्यासाठी व्यवहार केल्याची माहिती समोर आली होती.
या इमारतीत अशा दोन ऑफीस स्पेसेस विकत घेणाऱ्यांमध्ये ज्योती मंगल जाधव या महिलेचे नाव आहे. त्यांच्या नावावर कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीत दोन ऑफीस स्पेसेसची खरेदी करण्यात आलीय.
या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील ऑफीस नंबर 610 C ही जागा ज्याच क्षेत्रफळ ४६.७१ चौरस मीटर आहे ज्योती मंगल जाधव खरेदी केलीय. त्याचबरोबर सहाव्या मजल्यावरील 611 B ही आणखी एक ऑफीस स्पेनची जागा ज्याच क्षेत्रफळ ५४.५१ चौरस मीटर आहे ती देखील खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी करताना ज्योती मंगल जाधव यांचा मुळ पत्ता अहमदनगरचा देण्यात आलाय .
या ज्योती मंगल जाधव या वाल्मिक कराडशी संबंधित असुन त्यांची देखील मस्साजोग प्रकरणात चौकशी करण्यात आलीय. या ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुण्यात देखील फ्लॅट असून वाल्मिक कराड फरार असताना त्यांच्या घरी थांबला होता अशी माहिती समोर आली आहे. आता वाल्मिक कराड पुण्यामध्ये असताना नेमकं काय काय घडलं या सर्व बाजून पोलिसांकडून तपास सुरू आहे.