भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन, तरुणीसह तरुण मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात, आत्तापर्यंत भिगवण अपहरण प्रकरणात काय घडलं?
भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन, तरुणीसह तरुण मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात, आत्तापर्यंत भिगवण अपहरण प्रकरणात काय घडलं?
img
वैष्णवी सांगळे
इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा कथित अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याचा धक्कादायक खुलासा मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आला आहे.

माझं अपहरण झालंच नव्हतं मी माझ्या मर्जीने तरुणासोबत आले आहे असे म्हणत मुलीने स्वतः व्हिडीओ बनवला होता , तो तिने शेअर देखील केला. मुलगा आणि मुलगी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरच्यांना बोलावलं मात्र घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

 मुलींना भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावलं आणि तिथून ते निघून गेले. चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलं, मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्ट मध्ये समोर आला आहे. मुलगी आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे, तर पहाटे साडेपाच वाजता पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेत. कुठं गेलेत याबाबतची माहिती नाही. पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत. 

बारामती शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. मुलाच्या आणि मुलीच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त आहे. मुलीला न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात हजर करून न्यायाधीशांसमोर जबाब घेतला जाईल. इंदापूर किंवा बारामती पोलीस ठाण्यात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group