क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात
img
वैष्णवी सांगळे
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली दुखापत बळावल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. या शस्त्रक्रियेनंतर मोहोळ यांना आता किमान महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत याबद्द्ल माहिती दिली. 

 मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट 
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !

२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती !

खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय?

दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…



इतर बातम्या
Join Whatsapp Group