दुर्दैवी ! मराठा मोर्चादरम्यान मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा  मृत्यू
दुर्दैवी ! मराठा मोर्चादरम्यान मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोर्चादरम्यान मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अंतरवाली सराटीवरून निघालेला जरांगेचा मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी ते जुन्नरमध्ये दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरी येथे गर्दी केली होती. यादरम्यान मराठा बांधवांमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा 
लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, वंचित बहुजन आघाडीचा नेता ताब्यात

सतिश ज्ञानोबा देशमुख (वय ४० वर्षे) असं या मृत आंदोलकाचे नाव आहे. सतिश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते. पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वीच त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा मोर्चा काढण्यापूर्वी लातूरमधील एका मराठा तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावात ही घटना घडली होती. बळीराम मुळे (३५ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. सध्या या तरुणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group