हालचालींना वेग ! पोलिसांकडून नोटीस तर रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना सूचना
हालचालींना वेग ! पोलिसांकडून नोटीस तर रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना सूचना
img
वैष्णवी सांगळे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलन एकत्र आले आहेत.  या पार्श्वभूमीवर मुंबई आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा, असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. 

आझाद मैदानात मोठ्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर मुक्काम ठोकला आहे. सीएसएमटी परिसरात थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं कोर्टाच्या निर्दशनास आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून मराठा आंदोलकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. 

रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना 
१) मुंबईच्या सीएसएमटीमध्ये आंदोलकांनी मागण्या शांततेत आणि लोकशाही पद्धतीने कराव्या. 

२) महिलांच्या डब्यातून किंवा राखीव डब्यातून मराठा बांधवांनी प्रवास करू नये. 

३) वयोवृद्ध, दिव्यांग प्रवाशांसाठी अडचण होणार नाही, त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्ग मोकळा करून द्यावा

४) आझाद मैदानाकडे जाण्यासाठी जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करावा. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group