मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण कऱणारे मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे आझाद मैदानावर शेकडो आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील भावूक झालेले दिसले.
त्यांच्या एका आवाहनाने मुंबईत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. 29 ऑगस्टपासून बीएमसी, चर्चगेट, आझाद मैदान या परिसरात मराठा आंदोलकांनी ठाण मांडले होते. हजारो वाहने मुंबईच्या रस्त्यावर दिसत होते.दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे.
दोन दशकांपासून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. आपली दोन एकर जमीनही त्यांना विकावी लागली होती. जरांगेंना आपल्या कुटुंबालाही वेळ देता आला नव्हता. आज मागण्या मान्य झाल्या अन् त्यांचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.