मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांची आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली, या बैठकीला जवळपास सर्वच प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होती.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? बैठकीमुळे ते उघडे पडले. आपला खरा शत्रू कोण हे कळालं. आता चिंता करायची नाही विरोध करणारा संपवायचा एवढा मराठ्यांनी लक्षात घ्यावं,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना दिलाय.
मराठ्यांनी मराठ्यांच्या लेकरांबाबत जी अडचण आहे, दूर करायच्या कामाला लागायचं, असा सूचना त्यांनी माध्यमांशी बोलताना केल्यात. जो विरोध करेल त्याला राजकीय संपवायचं. एखाद्याच बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्त पण बोगस झालेलं असतं.खोटे कुणबी प्रमाणपत्र देणऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
त्यावरून बोलताना जरांगे यांनी बावनकुळे यांची जात काढत आपण त्यांचे भ्रष्टाचारबाहेर काढू. बावनकुळे हे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागलेत. त्यांना काही दिल तर ठीक नाही तर हे कारवाई करतो. बावनकुळे यांना त्यांची जात आरक्षणात केव्हा आली हे माहिती नाहीये. खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर सर्वात अगोदर तेच आरक्षणातून बाहेर पडतील असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.